दिव्यात टेपो ट्रॅव्हलर बसला भीषण आग ; जीवितहानी नाही.


ठाणे, दिवा : आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी ४:१५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  ओमकार नगर, दिवा आगासान रोड, दिवा (पू.) ठाणे या ठिकाणी रस्त्यावर पार्क केलेल्या MH ४३ BG ७३३३ टेम्पो ट्रॅव्हलर (मालक - श्री. आसित लिमन / २० सीटर मिनी बस) या बसला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहन व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.सदर घटनास्थळी लागलेली आग १६:५५ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांकडून पूर्णपणे विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Post a Comment

0 Comments