पेण- कोरोनाच्या संकटापासून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर भारतीय रेल्वेने एक्स्प्रेस रेल्वे सुविधा सुरु केली होती. मात्र लोकल सेवा बंद असल्याने जवळच्या थांब्यांवर जाण्यासाठीही रेल्वेने दुप्पट तिकीट आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र यामुळे त्रस्त झालेल्या प्रवासी वर्गातून याबाबत वारंवार तक्रारी होऊ लागल्याने आता रेल्वेने आपल्या नवीन धोरणानुसार जवळच्या स्थानकातील प्रवासासाठी आपले जुनेच दर लागू केल्याने आता पेण ते पनवेल मेमु रेल्वे तिकिट दर ३० रुपये रद्द करुन १०फक्त केले आहे दि. २२ फेब्रुवारीपासून पूर्वीप्रमाणेच फक्त १० रुपये हे जुने दर लागू केल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे.माझे पेण संघटना यांनी निवेदन देवुन तसेच अनेक प्रवासी संघटना यांच्यावतीने मध्य रेल्वेकडे यांच्याकडे वारंवार निवेदने सादर करुन प्रवाशांच्या विविध समस्यांबाबतीत लक्ष वेधले होते. तसेच प्रवासी संघटनेने आपल्या निवेदनातून केलेल्या विविध मागण्यांसह मेमू ट्रेनसाठी पेण पनवेल आकारण्यात येणाऱ्या ३० रुपयांऐवजी पूर्वीप्रमाणेच १० रूपये तिकीट दर आकारण्याची मागणी करुन यासाठी संबधितांकडे पाठपुरावा केला होता. रोहा, नागोठणे वरून आता पनवेलला २० रूपयांत जाता येणार तसेच पेण पनवेला१० रुपयात जाता येणार असल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण याबद्दल अनेक नागरिक प्रवासी तसेच माझे पेण संघटनेचे आभार व्यक्त करीत आहेत. पेणकरांच्या लढ्याला प्रयत्नास यश-हरिष बेकावडे सामाजीक संस्था विविध संघटना पञकार संघ आम्ही पेणकर रेल्वे समिती प्रवासी संघटनांनी व ईतर वैयक्तीत पञव्यवहार सातत्याने चालु ठेवुन वाढीव रेल्वे टिकीट पेण ते पनवेल पञव्यवहार चालु होता. पेण ते पनवेल १० रुपये टिकीटअसताना कोरोना नंतर टिकीटाचे दर रेल्वे प्रशासनाने३०रुयये वाढवुन प्रवाशाची आर्थिक लुटमार सुरु केली होती त्यासाठी विविध कारणे सांगुन दर कमी करण्यात सातत्याने टाळाटाळ होत होती परतु या विरोधात सर्वानी सातत्याने आवाज उठवल्याने यांची दखल रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागली सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी सातत्याने प्रयत्न केले सर्व पेणकराच्या प्रयत्नास यश मिळाले असुन रेल्वे प्रवास हा पेण ते पनवेल १०रुपये करण्यात आले आहे याचे क्षेय सर्वाना दिले जाते असे हरीष बेकावडे यांनी सांगितले.
0 Comments